मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (12:26 IST)

नागपूरात चार प्रेतांच्या अस्थी चोरीला

Allegations of bone smuggling in Nagpur
नागपूरात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील गंगाबाई स्मशानभूमीत चार प्रेतांच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रेतांवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र आज अस्थी संचय करण्यासाठी नातेवाईक स्माशान घाटावर आले असताना त्यांना अस्थी दिसत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. चारंही प्रेतांच्या अस्थी दिसत नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. अशात चार प्रेतांच्या अस्थी नेमक्या कश्या काय गायब होऊ शकतात हा प्रश्न आहे. नातेवाईक मृतकांच्या अस्थी शोधत आहेत. 
 
दरम्यान माजी नगरसेवक भास्कर पराते या स्मशानभूमीत अस्थी तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे. कारण एकाच वेळी चार मृतदेहांच्या अस्थी चोरी झाल्याने हा प्रकार तस्करीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांप्रमाणे हा प्रकार भटक्या कुत्र्यांकडून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 
चार प्रेत्यांच्या अस्थी चोरी मुळं मात्र एकच खळबळ उडाली असून या विचित्र प्रकारामुळे मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
file photo