शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (09:50 IST)

सांगली सुपुत्र शहीद रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

सांगली जिह्यातील शिगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आलं. सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला. सांगली जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावमध्ये रोमित चव्हाण यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते.
 
जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन कारवाईच्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये सांगलीतील शिंगाव सुपुत्र, 1 राष्ट्रीय रायफलचे 23 वर्षीय जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.
 
रोमित चव्हाण यांचे फोटो असलेले बॅनर गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव 20 फेब्रुवारी रात्री पुणे येथून इस्लामपूरला आणण्यात आले. नंतर आज सकाळी 6 वाजता त्यांच्या मूळगावी शिगाव येथील राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते नंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे रेजिमेंटल सेंटर वर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. 
 
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे सांगलीतील राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर धाकटी बहीण शिक्षण घेत आहे.