शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

सांगलीतील गुंड नवनाथचा खून केला नशेत, खून करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

Navnath
शहरातील कॉलेज कॉर्नरवरील आर्या पान शॉपसमोरील बोळात असणाऱ्या सात आर कॅफेच्या समोर रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ  लवटे वय २६ रा. शिवशंभो चौक कर्नाक रोड सांगली यांचा धारदार गुप्तीने हल्ला करून खून करणारा संशयित गुंड योगेश दिलीप शिंदे वय २५ रा. लक्ष्मीनगर, सांगली हा नशेखोर आहे. त्याने नशेतचा खून केला आहे त्याला उपचारासाठी पोलीसांनी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.  हा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे या खूनप्रकरणी मयत नवनाथ याचा भाऊ गोरखनाथ  लवटे यांने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
गुंड नवनाथ लवटे याचा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गुप्तीने हल्ला करून खून करण्यात आला. हा खुन योगेश शिंदे याने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यावर विश्रामबाग पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले त्याने नशा मोठ्याप्रमाणात  केली होती. म्हणून त्याला उपचारासाठी पोलीसांनी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.