सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (10:06 IST)

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, तापमानात वाढ

दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यात ताापानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा समान अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. तर विदर्भात मात्र 24 फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
राज्यात गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. हवामान विभागानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंशांनी वाढले असून मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश भागात किमान तापमान 2 ते 4 अंशांनी वाढले आहे. 
 
मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. याच विभागात सोलापूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३४ अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.