संबंधित माहिती
- सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य
- परमबीर सिंग यांच्या जीवाला धोका म्हणून ते लपून बसलेत - वकिलांची कोर्टात माहिती
- या पाच वाईट सवयी सोडा, नाहीतर आयुष्यभर दु:खापासून मुक्ती मिळणार नाही
- Chanakya Niti : अशा व्यक्तीशी लग्न केल्याने भाग्य बदलते, वैवाहिक जीवन आनंदी राहते
- जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असं वागत असेल तर एकदा विचारकरा....
प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा गळफास
अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यामध्ये प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
मृतक मुलगी ही १६ वर्षांची होती, तर मुलगा देखील १७ वर्षांचा आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी देखील एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मात्र, मुलीने आत्महत्या का केली याविषयी आणखी माहिती मिळू शकली नाही. पण या मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळातच मुलाने देखील गळफास घेत आयुष्य संपवले आहे. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला मिळाली.
प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने मुलाने आपल्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुढील लेख
