रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (20:29 IST)

एकाच सापामुळे भाऊ बहिणीचा मृत्यू

एका सापाने सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. घरात लपलेल्या मण्यार जातीच्या सापाने आधी भावाला चावले, त्याच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनासाठी माहेरी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाने चावल्याची घटना खानापूर तालुक्यातील आळसंदमध्ये घडली आहे. 
 
मृत विराजचे वडिल सुनिल कदम हे शेतकरी असून टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांना विराज हा एकुलता एक मुलगा व दोन मुली होत्या. तर भावाच्या मृत्यूनंतर त्याचा रक्षाविसर्जनसाठी मृत विराजची बहीण सायली जाधव ही माहेरी आली होती. विराजचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हा शुक्रवाी होता. गुरुवारी रात्री सर्वजण झोपले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायलीलाही दंश केला. तत्काळ सायली जावध हिला विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणार्‍या सायलीची प्रकृती खालावली आणि अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारा दरम्यान सायलीचाही अंत झाला.