सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (07:23 IST)

शासकीय आयटीआय विद्यार्थ्यांचा निर्घृण खून; वसंतदादा साखर कारखान्याच्या मागे घडली घटना

murder
वसंतदादा साखर कारखाना कमानीच्या पाठीमागे आयटीआयमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करून निर्गुण खून करण्यात आला. राजवर्धन राम पाटील (वय १८) मूळ गाव मुतकूनकी तालुका तासगाव असे मृत युवकाचे नाव आहे. पोलीस पथक घटनास्थळी पंचनामा करत आहे.
 
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, राजवर्धन पाटील हा औद्योगिक वसाहत सांगली येथील शासकीय आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे. तो दोन दिवसाच्या सुट्टीसाठी बुधगाव येथील त्याच्या मामाकडे आला होता. तो सायंकाळी सांगली साखर कारखाना परिसरात आला असता. त्याला तिघा संशयतांनी वसंतदादा साखर कारखाना कमानीच्या पाठीमागे घेऊन त्याचा खून करण्यात आला.
 
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात हलवला असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor