सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (10:38 IST)

लेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, स्थानिकांना अश्रू अनावर

औरंगाबाद - शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून सकाळी ६ वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. मूळ सदनिकाधाकांच्या पुनर्वसनावर अद्याप कुठलही निर्णय झालेला नाही. महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत घरकूल देण्यासाठी १४८ जणांचा प्राधान्याने विचार करण्याचा तोंडी शब्द प्रशासनाने दिला आहे. 
 
गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास आहेत.  तोडक कारवाईमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. लेबर कॉलनीतील ७० टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. मात्र कॉलनी सोडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी राहण्यासाठी घरे नाहीत असे देखील सांगण्यात येत आहे.
 
८ नोव्हेंबर, २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनीतील इमारती धोकादायक झाल्याचे सांगून त्या पाडण्याच्या नोटिसा होर्डिंग्सद्वारे बजावल्या होत्या.