शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (13:35 IST)

नदीत उलटली बैलगाडी, तिघींचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसामुळे एक बैलगाडी वाहून गेली. त्यात दोन मुलींसह एक महिला वाहून गेल्याची माहिती आहे. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  कन्नड नांदगाव सीमेवर ही घटना घडली.
 
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व रहिवासी आडगाव जेहुरा कन्नड येथील रहिवासी आहेत. कन्नड आणि नांदगाव तालुका यांना जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना नदीत एक बैलगाडी उलटली आणि 3 महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
 
बुडालेल्या महिलांचे दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे.