बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी पहाटे नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर एका खासगी बसची ट्रकशी धडक होऊन किमान २५ प्रवासी जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच ही खासगी बस पुण्याहून नागपूरला जात होती.
मिळालेल्या माहितीनुसारया भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी १५ जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात एवढा भीषण होता कि बसचा पुढील भाग अत्यंत क्षतिग्रस्त झाला.
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: मुंबई : दादर प्लाझा सिनेमाजवळ अनियंत्रित बेस्ट इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना चिरडले; २ जणांचा मृत्यू
तसेच मेहकर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे ते नागपूरकडे जाणारी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी माळी गावाजवळ ट्रकच्या मागच्या भागाला धडकली. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी मेहकर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे.