रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (14:56 IST)

प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात

अमरावती शहरातील अर्जुन नगर भागात खासगी बस नाल्यात उलटल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अमरावतीहून मोशीमार्गे मध्यप्रदेशात जात असताना ही बस नाल्यात कोसळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली आहे . अपघाताचे मूळ कारण अद्याप कळू शकले नाही.