गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (13:28 IST)

मित्राच्या मृत्यू नंतर तरुणाची आत्महत्या

मित्राच्या मृत्यू नंतर तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याला मित्र गमावल्याच्या धक्काच बसला आणि त्याने आपले आयुष्य संपविले. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात सातारा परिसरात घडली आहे. आपल्या मित्राच्या मृत्यू नंतर एका तरुणाने त्याच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन दिलीप बन्सवाल असे या तरुणाचे नाव आहे. या 28 वर्षीय तरुणाचा जिवलग मित्राचे आठ दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. हे दोघे जिवलग मित्र होते. आपला मित्र आपल्याला सोडून कायमचा गेला हा धक्का चेतनला बसला होता. 'मला त्याच्याकडे जायचं आहे' 'तो मला बोलावत आहे' असे तो नेहमी म्हणत असे. अखेर त्यानं आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले. चेतन हा संगणकशास्त्रात पदवीचं शिक्षण घेत होता. या घटनेमुळे मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.