धुळे जि.प,पं.स.साठी पोटनिवडणूक; पाच ऑक्टोबरला मतदान
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या 14 गट, तर पंचायत समित्यांच्या 28 गणांसाठी सोमवारी पोटनिवडणूक जाहीर केली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून पाच ऑक्टोबरला मतदान, तर सहा ऑक्टोबरला मतमोजणीसह निकाल जाहीर होईल.
धुळे जिल्हा परिषदेचे 14 गट आणि 28 गणांसाठी होत असलेल्या पोटनिवडणूकी साठी उद्या सकाळी 07:30 वाजता मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी गेल्या सात दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत होता. उमेदवार व त्यांचे समर्थक सभा, बैठका, रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आपली भूमिका मांडत होते. सोशल मिडियावर देखील प्रचाराचा जोर वाढला होता. भाजप, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनेक गट गणांमध्ये निवडणुकीची चुरस पहायला मिळत असून कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी लढत पहायला मिळत आहे. गट गणात अटीतटीचा सामना रंगला आहे. त्याचप्रमाणे कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर हे मतदान होत असल्याने त्यासाठीच्या उपाययोजनांवरदेखील भर देण्यात आली आहे.