suvichar

गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया, 50 किलोचा प्लॉस्टीक कचरा काढला

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (09:02 IST)
परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु शल्यचिकित्सा रुग्णालयात गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया करुन पोटातील 50 किलोचा प्लॉस्टीक कचरा बाहेर काढला. यामध्ये पोटात असलेले चप्पल, वाळू, दोन रुपयांचे दोन नाणे, एक खिळा, दोन तार, सेफ्टीपीन, गीट्टी, मोठादोर, अनेक कॅरीबॅगा आदी वस्तुही बाहेर काढले आहेत. डॉ.गजानन ढगे व त्यांच्या सहकार्यांनी मागील तीन वर्षात प्रथमच इतकी मोठी शस्त्रक्रीया गायीच्या पोटावर यशस्वीपणे केली.
 
प्रगतीशील शेतकरी राधाकिशन वाघमारे यांच्या मालकीच्या लालकंधारी जातीच्या गायीवर ही शस्त्रक्रीया झाली. पंधरा दिवसांपूर्वीच एका छानस्या गोऱ्याला जन्म दिल्यानंतर या गायीने दूध देणे बंद केले होते. गाय सुस्त झाली होती. तिच्या पोटात बद्धकोष्ठता झाली होती. बहुदा पोटात पोटसूळ उठल्याने तिला वेदना होत असल्याने ती दात खात होती. यामुळे राधाकिशन वाघमारे यांनी तातडीने या गायीला पशुचिकित्सा रुग्णालयात दाखल केले होते. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत, लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून होणार वसुली

LIVE: लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत

छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद निर्माण, प्रकाशकाकडून ४५हजार प्रती नष्ट

नाशिकच्या चांदवड घाटात धावत्या एसटी बसला आग, सर्व प्रवासी सुखरूप

World Environment Day 2026 Quotes in Marathi जागतिक पर्यावरण दिन कोट्स

पुढील लेख
Show comments