1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (23:03 IST)

तब्बल 2 महिन्यांनी केंद्रीय पथकाला पाहणीसाठी आले

जुलै ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगलीला पुराचा फटका बसला. त्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी केंद्रीय पथकाला  वेळ मिळाला. ते 2 महिन्यापुर्वीच्या पूराची पाहणी करायला सांगली कोल्हापुरात पोहोचले. 
 
आधीच महापुरामुळं सर्वस्व वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रशासन केला जात आहे. गेल्या जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात  झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तब्बल दोन महिने पूरग्रस्तांनी नुकसान भरपाईसाठी वाट पाहिली.पण मदत मिळाली नाही. 
 
आता महापुराच्या सगळ्या खाणाखुणा ओसरल्यानंतर, तब्बल दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी पथक शिरोळमध्ये शेतकऱ्य़ांच्या बांधावर पोहोचलं. त्यावेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी बुके देऊन त्यांचं उपरोधिक स्वागत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.