गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:31 IST)

फुकट्या प्रवाशांवरील कारवाईत मध्य रेल्वे अव्वल

Central Railway top in crackdown on free passengers
गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. याच प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आणि दंडात्म कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४६.२६ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत ३०० कोटी रुपयांची वसूली केली आहे. शिवाय, फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात मध्य रेल्वे अव्वल स्थानावर आहे.
 
मध्य रेल्वे प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ म्हणजेच एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या अशा ४६.२६ लाख प्रवाशांवर कारवाईत करत त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांची वसूली केली आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षी १२.८० लाख टक्क्याने ओलांडले आहे. तसेच, एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८ लाख टक्के लक्ष्य पार केले आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor