मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (07:57 IST)

राज्यातील सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवलं. त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दुसरीकडे  अभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून, 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या समोरचा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे.