सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (08:39 IST)

'या 'जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

cyclone
रत्नागिरी व रायगडसह राज्यातील पुणे, सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात वीजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणांवर असल्याचे विविध शाळेने जारी केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे. या संदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. गारपीट आणि पावसामुळे शेकऱ्यांचे नुकसान झाले आहे.राज्यात अवकाळी पावसाची स्थिती अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे  हवामानात बदल झाला आहे. राज्यात येत्या तीन ते चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor