गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (22:01 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढणार

raju shetty
स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आंबा (ता शाहूवाडी) येथे शिबीर झाले.
 
शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor