1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (18:27 IST)

28, 29 डिसेंबरला राज्यात पावसाचा अलर्ट

Weather Forecast मुंबई : भारतीय हवामान खात्याने राज्यात 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवार (26 डिसेंबर) पासून महाराष्ट्रावर आणि 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD)प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. 28-29 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यतावर्तवण्यात आली आहे.
 
राज्यात कुठं पाऊस पडणार
हवामान खात्याने 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.  27 रोजीविर्दभात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.