सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जुलै 2019 (16:11 IST)

युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच : चंद्रकांत पाटील

chandrakant patil
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ''भाजपा आणि शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तसेच जागावाटप करताना याधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत.''त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामधून युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपले एकमेव लक्ष्य असून काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला होता.