सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:17 IST)

चंद्रकांत पाटील यांनी केला 'हा' गौप्यस्फोट

येत्या ७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी फडफड सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हे राजकारण नसून ७ मार्चनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. तसेच सर्व प्रकारचे पुरावे समोर येतील. यामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे आणि कोणाला तुरूंगात जायचं आहे, याबद्दलचा उलघडा होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
 
दिशा सालियानच्या प्रकरणात नक्की काय झालेलं आहे. हे सर्व बंदिस्त आहे. परंतु ७ मार्चनंतर या प्रकरणाचा उलघडा होईल, असं पाटील म्हणाले.