बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:13 IST)

नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध ! लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ?

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ! जर तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे कि नाही हे पहायचे असेल तर त्याचे उत्तर महाराष्ट्र मतदार यादी 2022 मध्येच मिळेल. त्यामुळे तुम्हाला मतदार यादी पाहावी लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला Maharashtra CEO Voter List 2022 बद्दल माहिती हवी असेल तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठी आहे.
 
तुमचे नाव जर या यादीत नसेल तर तुमच्या मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मतदार यादीत तुमचं नावं पाहायचं असेल तर ही पोस्ट पूर्णपणे वाचावी लागणार आहे.
 
राज्य सरकारने ceomaharashtra.nic.in या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदार यादी ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्ही तुमचे नाव कुठून पाहू शकता.
 
आता जर तुमचा प्रश्न असेल की यादीत तुमचे नाव कसे पाहायचे ? तर या लेखात महाराष्ट्र मतदार यादी काय आहे, मतदार यादीचे उपयोग (फायदे), महाराष्ट्र मतदार यादी 2022 चा उद्देश आणि ही माहिती पाहूयात.
 
तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. भारताच्या हितासाठी मतदान करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यांना भारताच्या भविष्याचा विचार करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार आहे.
 
सरकार प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देते, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि तुमचे नाव महाराष्ट्राच्या मतदार यादीत असेल तरच तुम्ही मतदान करू शकता.
 
तर तुमचे मत रद्द….
 
तुमचे नाव येथे नसल्यास तुमचे मत रद्द केलं जाईल. महाराष्ट्र मतदार यादी 2022 मध्ये तुमचे नाव शोधणे गरजेचं आहे. जे महाराष्ट्र सरकारने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइट ceomaharashtra.nic.in वर प्रसिद्ध केले आहे,
 
जर तुम्ही मतदार ओळखपत्र 2022 साठी अद्याप अर्ज केला नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून मतदानात सहभागी होण्यास पात्र ठरू शकता.जर तुम्ही या आधी अर्ज केला असेल तर अपडेटेड यादी वेबसाईटवर पब्लिश केली असून ती तुम्ही पाहून शकता.
 
महाराष्ट्र मतदार यादी 2022 चा उद्देश :-
मतदान ओळखपत्र 2022 किती महत्त्वाचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे, परंतु सरकारने ही यादी थेट सरकारी कार्यालयातून उचलून वेबसाइटवर का टाकली हे जाणून घेणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
याचे अनेक उद्देश आहेत, जसे की पूर्वी मतदार यादीतील नाव शासकीय कार्यालयात जाऊन पाहावे लागत होते, परंतु आता ते तुम्ही घरबसल्या इंटरनेटद्वारे सहज पाहू शकता आणि तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. आणि तुमचा वेळ आणि पैसाही वाचेल.
 
मतदानासाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची नावे यादीत यावीत हाही मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र छायाचित्र मतदार यादी 2022 मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, बूथ क्रमांक, वय, घर क्रमांक, पत्ता, मतदान केंद्राची माहिती. दस्तऐवजासाठी मतदार ओळखपत्र देखील वापरले जाऊ शकते, मतदार ओळखपत्र ओळखपत्र म्हणून देखील वापरलं जातं. पूर्वी एखादी व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याची डुप्लिकेट कॉपी काढत असे, पण मतदान यादी ऑनलाइन आल्याने ही समस्याही दूर झाली आहे…
 
महाराष्ट्र मतदार यादीचे 2022 फायदे :-
मतदार ओळखपत्र कागदपत्रासाठी वापरलं जातं.महाराष्ट्रातील नागरिकांना मतदार ओळखपत्र सहज मिळू शकतं, म्हणून सरकारने ते ऑनलाइन पास केलं आहे.एखादी व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याची डुप्लिकेट कॉपी काढायचे, मात्र मतदान यादी ऑनलाइन केल्याने ही समस्याही दूर झाली आहे.
पूर्वी मतदार यादीतील नाव शासकीय कार्यालयात जाऊन पाहावे लागत होते, मात्र आता ते घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून सहज पाहता येणार आहे.
 
तुम्हाला सरकारी कार्यालयातही जावे लागणार नाही आणि तुमचा वेळ आणि पैसाही वाचेल.2022 च्या मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुमचे मत रद्द केलं जाणार आहे.
 
महाराष्ट्र मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस…
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र मतदार यादीच्या ऑफिशियल वेबसाइट वर जावं लागेल. यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
 
वेबसाइटच्या होम पेजवर, मतदार यादीमध्ये नाव शोधा म्हणजे Find Name in Voter List हा ऑप्शन दिसेल त्या बाजूला तुम्हाला क्लिक करावं लागेल.
 
त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला राज्यातील सर्व जिल्हे दिसतील, जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करावं लागेल.
मग तुमचा विधानसभामतदारसंघ भाग. (Assembly constituency Part) इ, माहिती भरावी लागेल. तिथे तुमची योग्य माहिती भरा.
 
माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओपन पीडीएफ PDF या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 
आता तुम्ही येथून Maharashtra CEO Voter List PDF DOWNLOAD करू शकता आणि यादीत तुमचे नाव देखील पाहू शकता.
 
घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन नवीन Voter ID बनवा…Voter ID बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा…येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी Register as a New Elector/Voter हे पेज दिसेल.यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
 
यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.द्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड घरी पोस्टाद्वारे येईल.