1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:26 IST)

नवीन मंडळाची स्थापना? शेतमजूर ,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस

The intention to form a board for agricultural laborers
कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजूर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि दिशा फौंडेशनमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.  
 
कामगार मंत्री  मुश्रीफ म्हणाले, असंघटित क्षेत्रात सुरक्षितता नसल्याने धोके वाढले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगा सुर‍क्षित व्हावा यासाठी कामगार विभागामार्फत या कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारांने आपली नोंदणी करावी व केलेल्या नोंदणीचे नुतनीकरण गरजेचे आहे. एकदा नोंदणी झाली की त्यांना योजनांचा लाभ मिळण्यास सुकर होईल.
 
कामगार मंत्री  मुश्रीफ म्हणाले, मर्यादित कामासाठी असणारे बांधकाम मंडळ आता व्यापक झाले असून मंडळाकडे निधीही मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या तपासणीसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. ही व्यवस्था झाल्यानंतर मंडळाकडे अधिकचा उपकर जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपकरातून जमा झालेला निधी केवळ नोंदणी केलेल्या कामगारांच्या कल्याण्यासाठीच वापरण्यात येत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी करावी. कामगारांच्या नोंदणीसाठी दिशा फौंडेशन पुढे आले असून त्यामुळे नोंदणी करण्यास आता गती येईल. दिशा फौंडेशनने या कामात पुढाकार घेतल्याबद्दल कामगार मुश्रीफ यांनी दिशा फौंडेशनचे  आभार मानले.