गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (08:35 IST)

पुण्यात रिक्षा भाडेवाढीनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ

After the increase in rickshaw fare in Pune
पुण्यात रिक्षा भाडेवाढीनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात () किलोमागे 1 रुपया 80 पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ झाल्याने पुण्यात सीएनजीचा दर हा 63 रुपये 90 पैसे का झाला आहे. 15 दिवसातील ही चौथी दरवाढ आहे.
 
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाई गगनाला भिडत आहे. आता पुण्यात सीएनजीत दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना डिझेलनेही शतकाचा टप्पा गाठला आहे. आता तर पुण्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल किंमतीबरोबर सीएनजीच्या दरात 1 रूपया 80 पैसे वाढ झाली आहे.