मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (12:21 IST)

पुण्यात भीषण अपघात, कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा

Terrible accident in Pune
पुणे- मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे याठिकाणी नवले पुल परिसरामध्ये एक अपघातात एका कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरच दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. 
 
मंगळवारी 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेला हा कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावर असलेले नियंत्रण सुटले. महामार्गावरच रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
 
यामध्ये जखमी चालकाला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.