Chandrapur : स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेलेला मृतदेह पुन्हा घरी आणला, कारण जाणून घ्या
चंद्रपुर जिल्ह्याच्या कोरपणा तालुक्यात नवेगावात जमिनीच्या वादातून अंत्यसंस्काराला विरोध करण्यात आल्यामुळे एका वृद्ध महिलेचा मृतदेह पुन्हा घरी नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरस्वती लक्ष्मण कातकर (90)असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे गुरुवारी आजाराने निधन झाले. नावेगावातील रहिवासांना हक्काची स्मशानभूमींनाही त्यामुळे मृतदेहावर शेतात अंत्यसंस्कार केले जाते. ती जागा शासनाची असून त्यावर शेतकऱ्याने अतिक्रमण केल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात.
सदर महिलाचे गुरुवारी निधन झाले त्यांना गावात स्मशानभूमी नसल्याने शेतात अंत्यसंस्काराला नेले असता शेतकऱ्याने त्याच्या जागेवर अंत्यसंस्काराला नकार दिले. त्यामुळे महिलेचे मृतदेह बऱ्याच वेळ रस्त्यावर ठेवले होते. नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता पुन्हा घरी आणले. या प्रकरणामुळे गावात तणावाची स्थिती उद्भवली.
पोलीस आणि महसूल विभागाला घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सरपंचाच्या मदतीने शेतकरी आणि कुटुंबीयांची समजूत काढत अतिक्रमण केलेल्या शेतातच महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
Edited by - Priya Dixit