1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (22:12 IST)

‘द काश्मीर फाईल्स’च्या शो वेळी नाशकात गोंधळ

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमावरून नाशिक येथील पीव्हीआर थिएटर च्या ठिकाणी गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाले. भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने चित्रपट पाण्यासाठी आलेल्या महिलांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
सध्या देशभरात काश्मीरमधील पंडितावर आधारीत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण या चित्रपटाच्या बाजूने आहेत, तर काहीजण याच्या विरोधात. राज्यात सगळीकडे सध्या या चित्रपटाचे शोज सुरु आहेत. अशातच नाशिकमधील कॉलेज रोडवरील पीव्हीआर सिनेमामध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या महिलांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.
 
यावेळी कॉलेजरोडवरील पीव्हीआर मध्ये काही महिलांचा ग्रुप भगवी शाल घालून प्रवेश केला. मात्र यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्यानंतर या महिलांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. भगवी शाल घालून प्रवेश नाकारण्यात आल्याने महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शो वेळी हा गोंधळ उडाला.
 
११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड या अन्य राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. हा चित्रपट १९९०मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित असून, विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.