छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे कोंग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जन्मदिवस सोहळ्याला हजारोंच्या संख्येने लोकांशी भेटल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर भुजबळ यांनी सार्वजनिक ठिकाणी आवर्जून मास्कचा वापर केला. दरम्यान, वायरल इन्फेक्शन मुळे भुजबळ यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळते.
छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा त्यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या हजारो हितचिंतकाकडून शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर त्यांना काहीसा त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक उपचार झाला. त्यानंतर होणार्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावलेले बघायला मिळाले. मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याच्या ४०व्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात त्याच सोबत शिर्डी येथील राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या मंथन शिबिरातही भुजबळ यांनी मास्क लावलेले बघायला मिळाले. छगन भुजबळ यांना श्वसनाचाही त्रास होत असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, भुजबळ यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor