गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2024 (12:44 IST)

छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ आईला पाठवला

rape
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडला आहे. या प्रकरणात तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ आणि अश्लील फोटो  काढून तिच्या आईला पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय शेजूळ असे या आरोपीचं नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व तरुणीची वर्षभरापूर्वी ओळख झाली. आरोपीने तरुणीला प्रेम जाळयात अडकवून तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला नंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ मोबाईल मध्ये काढत त्याने तरुणीच्या आईला पाठविले. तसेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. तरुणीला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या त्रासाला कानाताळ तिने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार केली.पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.  
 
 
 Edited by - Priya Dixit