छत्रपती संभाजी महाराजांवरील 'आक्षेपार्ह' मजकुरावर मुख्यमंत्री फडणवीस यांची विकिपीडियावर कारवाई
छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह माहिती देण्याविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकिपीडियाला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महारांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आक्षेपार्ह मजकूर टाकण्याऱ्यांवर कारवाई करण्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची आक्षेपार्ह माहिती काढून देण्याचे आदेश दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची कहाणी सांगतो. पण चित्रपटाच्या पार्श्वभूमीबाबत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या महानिरीक्षकांना विकिपीडिया अधिकाऱ्यांशी बोलण्यास आणि साइटवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध 'आक्षेपार्ह' मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे. यासोबतच, त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणाऱ्या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर हे असे लेखन ते सहन करणार नाहीत. त्यांनी सांगितले की, आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Edited By - Priya Dixit