मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (09:14 IST)

अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

eknath shinde
नॉन ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थावर नव्याने लावलेल्या पाच टक्के जीएसटी संबंधात केंद्र सरकारकडे हा कर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांना दिले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अग्रिकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवीन लावण्यात आलेल्या जीएसटी मुळे राज्यातील सामान्य जनतेबरोबर व्यापाऱ्यांच्या मध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली व हा कर रद्द होण्याची आवश्यकता असल्याचे आग्रही प्रतिपादन केले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी व जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत असून हा कर रद्द करावा यासाठी राज्य सरकार केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली.तसेच व्यापार, उद्योग क्षेत्राच्या विविध प्रश्नां संबंधी चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळा समवेत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी उपस्थित शिष्टमंडळात संदीप भंडारी,आशिष नहार, निरव देडिया, विकास अच्छा, दीपक मेहता, सागर नागरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधींनी या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे सांगून राज्य शासन याविषयी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याने याविषयी समाधानकारक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली.