सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (10:05 IST)

कीर्तनाच्या क्लिप यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
 
"आपल्या कीर्तनाच्या व्हीडिओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत. त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील," असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. 
 
अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं.  आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली. 
 
इंदुरीकर नेमकं असे म्हणाले
चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल हा विनोद नाही, जे सत्य आहे ते सांगत आहोत.
 
यापूर्वी अपत्य जन्माच्या बाबतीत इंदुरीकर महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून बराच मोठा वादही झाला होता.