गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2024 (20:20 IST)

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये पेटवली सिगारेट, स्मोक सेन्सर सक्रिय, गुन्हा दाखल

smoking
विमानाच्या प्रवासात धूम्रपान निषेध असून दिल्ली हुन मुंबई जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेट मध्ये एका प्रवाशाने धूम्रपान करण्यासाठी सिगारेट पेटवली असता विमानाचा स्मोक सेन्सर सक्रिय झाला. प्रवासी बाहेर आल्यावर टॉयलेटची तपासणी केबिन क्रू ने केली असता त्यात काडेपेटी आणि जळालेली सिगारेट सापडली.या प्रकरणी विमान मुंबईत उतरल्यावर प्रवाशाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात सदर घटना घडली. 176 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने दिल्ली विमानतळावरून संध्याकाळी 5:15 वाजता उड्डाण केले. मुंबई विमानतळावर उतरण्याच्या 50 मिनिटांपूर्वी उत्तरप्रदेशातील रहिवासी टॉयलेट मध्ये गेला आणि सिगारेट ओढू लागला. त्याने सिगारेट ओढतातच स्मोक सेन्सरने केबिन क्रू ला सतर्क केले.

प्रवाशी बाहेर आल्यावर क्रू मेम्बर ने टॉयलेटची तपासणी केली असता त्यांना काडेपेटी आणि जाळून विझवलेली सिगारेट सापडली. केबिन क्रू ने ही माहिती वरिष्ठाना दिली. क्रू मेम्बर ने चौकशी केली असता प्रवाशाने सिगारेट ओढल्याचे कबूल केले.  

घडलेले सर्व विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळविले नंतर या प्रवाशाला सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तक्रारीच्या आधारे विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाच्या विरुद्ध आयपीसी आणि विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited by - Priya Dixit