नाशिक शहरात या वेळेत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरिकांना मनाई…

market
Last Modified गुरूवार, 3 जून 2021 (11:10 IST)
नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भावामूळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गं’भीर परिस्थिती निर्माण होवू नये, या करिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे.
त्यानुसार नागरिकांना दु. 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक अनुज्ञेय कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी
मांढरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी म्हणून शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार व 31 मे 2021रोजीच्या राज्य शासनाने पारीत केलेले आदेशातील निर्बंध तसेच या आदेशातील लागू केलेले सर्व निर्बंध काही अटी व शर्तींचे अधीन राहुन जून, 2021 रोजी सकाळी 07.00 ते 15 जून, 2021 सकाळी 07.00 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून
जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी
मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

जर तुम्हाला दुपारी ३ ते सकाळी ६ च्या दरम्यान बाहेर जायचे असेल तर.. :
आदेशान्वये नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 या कालावधीत दररोज दु. 3 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक व अनुज्ञेय बाबींशी निगडीत व्यक्तींनी बाहेर पडतांना फोटो ओळखपत्र तसेच बाहेर पडण्याचे अनुज्ञेय बाबीसंदर्भातील सबळ पुरावादर्शक कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांनी 31 मे 2021 नुसार ठरवून दिलेल्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व आस्थापना वगळून इतर
सर्व आस्थापना व सेवा ठरवून दिलेल्या वेळेतच सुरु राहतील. तसेच सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांना
सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी अनुज्ञेय राहील. तथापि, यासाठी पूर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था किंवा समुहांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड विधानचे कलम 188 तसेच प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान
मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष देसाई
देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही ...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयात 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली सीटी काढून ...