संबंधित माहिती
- Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटओळखण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा
- शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य खासदारांच्या घर, कार्यालयाला सुरक्षा कवच
- शिन्देगटातील संभाव्य खासदारांच्या घराला आणि कार्यालयाला सुरक्षा कवच दिले
- सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल
- तरुणी आणि महिला सुरक्षा रक्षकात जोरदार भांडण
CM शिंदेंची सुरक्षा वाढवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला सुरक्षेच्या कारणास्तव दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे. रस्त्यालगत बंगला असल्याने आतल्या हालचाली दिसू नयेत यासाठी बंगल्याला चहूबाजूंनी कुंपण करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे नंदनवन इथेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ते वर्षा बंगल्यावर राहणार का असा प्रश्न होता मात्र ते आता नंदनवन बंगल्यातच राहणार असल्याचं कळतयं.
पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे. युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतयं.
