सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (12:12 IST)

शिन्देगटातील संभाव्य खासदारांच्या घराला आणि कार्यालयाला सुरक्षा कवच दिले

eknath shinde
शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागपूरमधील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे.
 
नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांचे घर आणि निवासस्थानाबाहेर 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. यामध्ये नाशिकचे स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांचा बंदोबस्त आहे. खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सहभागी झाल्याच्या चर्चांमुळे सुरक्षा पुरवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जवळच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांपाठोपाठ खासदारांचाही गट स्थापन करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे,  प्रतापराव जाधव,  धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे हे खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.