मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (07:58 IST)

शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या

shinde
दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यक्तीशः कामाचा आढावा घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आम्ही सारे विचारांचे वारसदार असून एका सच्चा हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
 
शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor