सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (13:49 IST)

नमाज अदा करताना हार्ट अटॅक

नागपूर. जाफरनगर येथील बडी मशिदीत नमाजाच्या वेळी एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हमीद खान, इंद्रनगर, अकोट निवासी असे मृताचे नाव आहे.  
 
 मिळालेल्या माहितीनुसार, हमीद खान उपचारासाठी नागपुरात आले होते आणि भावासोबत येथे राहत होते. ते बडी मशिदीत पोहोचले आणि मागच्या रांगेत उभे राहून नमाज अदा करू लागले. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्राथमिक तपासणीनंतरच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

Edited by : Smita Joshi