आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार..

asaram
Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:04 IST)
नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात काम करणारी एका व्यक्ती पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आली असता चार अनोळखी लोकांनी त्यांचे बळजबरीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असता. मात्र पंचवटी पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले.

पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 281 /2021 कलम 365, 34 भा.दं.वि या गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती संजीव वैद्य, (वय 44, राहणार आसाराम बापू आश्रम गंगापूर रोड,नाशिक) हे दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आले असता, चार अनोळखी लोकांनी त्यांचे ब’ळज’ब’रीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशाने आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 अमोल तांबे व सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि रोहित केदार यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले.
त्यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच पथकासह भेट देऊन सदर गुन्ह्यातील येणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर सीसीटीव्ही मध्ये चार इसम इनोवा क्रिस्टा गाडीतून घेऊन जात असल्याचे
दिसून आले. या गाडीचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवून सदर इनोवा क्रिस्टा गाडीचा शोध घेण्याकरता घोटी टोल नाका तसेच शिंदे पळसे टोल नाका या ठिकाणी जाऊन सदर ईनोवा गाडीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याचप्रमाणे CDR Analysis सुद्धा करण्यात आले.

तपासादरम्यान सदर कि’ड’नॅ’प व्यक्ती, गुजरात राज्य अहमदाबाद येथील हाफ म’र्ड’र केस मध्ये बारा वर्षापासून फरार होती. त्याला अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस हे नाशिकला आले व सदर इसमास अहमदाबादला घेऊन गेले अशी माहिती मिळाली.. या घटनेबाबत खात्री करण्याकरता गुजरात अहमदाबाद क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता, त्यांनी तो त्यांच्याकडील साबरमती पोस्टे गुरनं 426/2009 भादवी 307,120(ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यात 12 वर्षे पासून फरार असल्याचे सांगितले. संजीव वैद्य यालात्यांच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे.
तरी पंचवटी पोलिस ठाण्याचे पोनि अशोक साखरे ,सपोनि सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी रोहित केदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर अतिसंवेदनशील गुन्ह्याचा गुन्हा घडल्यापासून तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकिस आणला आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

अविनाश भोसले आता CBI च्या नजरकैदेत

अविनाश भोसले आता CBI च्या नजरकैदेत
CBIने अटक केल्यानंतर आता अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत करण्यात आली आहे. भोसलेंना सध्या ...

तलवार घेऊन हिरोपंती पडली महाग

तलवार घेऊन हिरोपंती पडली महाग
हातात तलवार घेऊन केलेले फोटोसेशन सोशल मीडियावर पोस्ट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले ...

टॅक्सी चालकांना पाण्याची बॉटल देत केला त्यांच्या कार्याला ...

टॅक्सी चालकांना पाण्याची बॉटल देत केला त्यांच्या कार्याला सलाम
मुंबईची वाहतूक ही शहरातील महत्वपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे. आणि टॅक्सी सेवा हि त्यातीलच एक ...

राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवार दगडूशेठ मंदिर परिसरात

राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवार दगडूशेठ मंदिर परिसरात गेले?
राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद ...

शरद पवारांचे दगडूशेठ दर्शन

शरद पवारांचे दगडूशेठ दर्शन
पुणे: ब्राम्हण संघटनांसोबच बैठक घेतल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ...