मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:50 IST)

सीटबेल्ट सक्ती मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

maharashatra navnirman sena
मुंबईत चारचाकी वाहनांच्या मागच्या सीटवरील प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आलं आहे. ११ नोव्हेंबरपासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार आहे. मात्र, याविरोधात मनसेने ही सक्ती मागे घेण्याचा इशारा दिला आहे. सीटबेल्ट सक्ती मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसे नेते संजय नाईक यांनी इशारा दिला आहे.
 
संजय नाईक म्हणाले की, मुंबईसारख्या वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती नको. आधीच वाहतूक विभागाकडून विविध प्रकारचे दंड आकारण्यात येत आहेत. तसेच मुंबई शहरात मेट्रो प्रकल्प, पूल, निकृष्ट दर्जाचे रस्ते, खड्डे, रस्त्यांची कामे चालू आहेत. यामुळे वाहतूक रहदारीची मोठ्या प्रमाणात गैरयोय होत आहे. त्यात आता सर्वसामान्यांना आणखी भुर्दंड सोसावा लागेल. यामुळे सीट बेल्टची सक्ती नको अशी मनसेची भूमिका आहे. मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन पुकारू असे म्हटले आहे. 
 
याआधी  नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी 14 ऑक्टोबरला जाहीर केले. मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे.

त्यामुळे सहप्रवाशांना सीटबेल्टची सुविधा नसल्यास वाहनचालकांनी सीटबेल्ट बसवून घ्यावेत. १४ नोव्हेंबरपासून सहप्रवासी विनासीटबेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते. मात्र याविरोधात मनसे नेते संजय नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Edited by- Ratnadeep Ranshoor