1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:40 IST)

नाशिकच्या सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार, सेबीने दिली मंजुरी

नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईनची निर्मिती करणाऱ्या सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार आहे. यासाठी सुलाला बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. देशातील आघाडीची वाइन उत्पादक आणि सेलर सुला विनयार्ड्सला आयपीओ  जारी करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.
 
हा आयपीओ थेट विक्री ऑफर असेल. यामध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक २५, ५४६, १८६ इक्विटी शेअर्स ऑफर करतील. सुला व्हाइनयार्ड्स ही लाल, पांढरी आणि स्पार्कलिंग वाईन विकते. ते १३ ब्रँडच्या अंतर्गत ५६ प्रकारचे मद्य तयार करते. गेल्या वर्षी सुला विनयार्डसने अहवाल दिला की कंपनीची उत्पादन क्षमता १४.५ दशलक्ष लिटर आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २२ मध्ये अनेक पटींनी वाढून ५२.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २१ मध्ये केवळ ३.०१ कोटी रुपये होता. या कालावधीत महसूल ८.६०% वाढला आणि तो ४५३.९२ कोटी रुपये राहिला.

Edited by- Ratnadeep Ranshoor