1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:00 IST)

राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार

concept of Happy Saturday will be implemented in every school in the state
मुले खुश राहावीत यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला यांचे शिक्षण तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप कार्यक्रमात मुंबई येथून ते ऑनलाईन बोलत होते.
 
यावेळी एन.सी.आर.टी चे प्राध्यापक टी.पी शर्मा, राधा अतकरी, प्रदीप कुडाळकर, वासुदेव नाईक, अच्युत भोसले, कल्पना बोडके, म.ल. देसाई, कृष्णकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे, प्रवीण राठोड,  प्रियांका देसाई, कैलास चव्हाण, अवधूत मालणकर, महेश चोथे, डॉ. आचरेकर, लक्ष्मीकांत बानते, जयंत भगत, प्रसाद महाले आदि उपस्थित होते.
 
मंत्री केसरकर म्हणाले, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती कौतुकास्पद होत्या. विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी यापुढे आपली वाटचाल करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात मुलांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे यासाठी “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेत अंतर्गत दर शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास वगळून संगीत, नाट्य, कला आदी क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे.