शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (15:19 IST)

बस थांबवून कंडक्टरची दरीत उडी

death
राज्य परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टराने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणहून निघून अकोले आगारात जाणारी बस माळशेज घाटात येताच कंडक्टरने बस थांबवून थेट दरीत उडी घेतली. गणपत इडे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
 
दरीत काही अंतरावर इडे यांचा मृतदेह सापडले असून शव विच्छेदन करण्यासाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.