1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (21:08 IST)

बारावीच्या परीक्षेत नापास, विद्यार्थ्याची आत्महत्या

इयत्ता बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. आज (8 मे) बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला अन् निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन त्या विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या केली. निखिल लक्ष्मण नाईक असं विद्यार्थ्याचं नाव आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल आज जाहीर झाला. दरम्यान निखिल नाईक हा बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन निकाल जाहीर होताच, पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच निखीलने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारून आत्महत्या केली. निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करत आहेत.