सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (10:01 IST)

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Ramadan 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन मुकाबला करीत आहोत. एरव्ही आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र आपण यंदा रमजानच्या महिन्यात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 
‘मुस्लिम धर्मगुरुंनीही या कोरोना संकटात शासनाला चांगली साथ दिली आहे. मी त्यांनाही आवाहन करतो की कुठेही धार्मिक आणि सार्वजनिक स्थळी एकत्र न येता रमजानचा हा पवित्र सण साजरा करू यात आणि आपल्या तसेच समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देऊ यात,’ असेही मुख्यमंत्री म्हणतात.
 
रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.