1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (07:52 IST)

काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात : आठवले

राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार जावं म्हणून आमचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 
 
सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आठवले एकाच मंचावर होते. यावेळी दोघांनीही एकमेकांची प्रचंड स्तुती केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले यांना पटोलेंबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, एवढं मात्र खरं, असं आठवले म्हणाले.