1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (21:20 IST)

काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे : तांबे

BalaSaheb Thorat
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी मोठं विधान केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे असं आता सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. संगमनेरमध्ये  निवृत्ती महाराजांचं किर्तन आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्ताने ते बोलत होते.
 
राजकारणातली नेते मंडळी दिशा द्यायचे आणि लोक ऐकायचे. आता जमाना बदलला आहे. लोकांना जे आवडतं ते करावं लागतं अशी स्थिती आहे. अशा स्थितीत कुणीतरी समाजाला आरसा दाखवला पाहिजे ते निवृत्ती महाराज करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचं नाव मोठं केलं तसंच महाराजही करत आहेत असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
 
 बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढदिवशीच राजीनामा बॉम्ब टाकल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत संवाद साधत पक्षाच्या व्यासपीठावरच याबाबत चर्चा व्हावी अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor