शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 5 जून 2021 (16:15 IST)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्यात स्वबळाचा नारा

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.
नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा."
काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून भाजपनं खोटी स्वप्नं दाखवून देशाला अधोगतीकडं नेण्याचं काम केलंय, असंही पटोले म्हणाले.
 
धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी नाना पटोलेंनी उपस्थितांशी संवाद साधला.