शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (21:43 IST)

नाशिकहून सुरतला जाणारे कॉंग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

arrest
काँग्रेसचे नेते राहुल गांधी  मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात सुरत न्यायालयात अपील करणार होते. त्यासाठी राहुल गांधी स्वतः सत्र न्यायालयात हजर राहणार होते. यासोबतच नियमित जामिनासाठी देखील न्यायालयात ते अर्ज दाखल करणार असल्याचे चर्चेत होते. यावेळी राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील कॉंग्रेसच्या  बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले. मात्र, काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवले असून अटक देखील केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यामध्ये नाशिकच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.
 
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जात असताना नाशिकच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडविले. त्यांनतर त्यांना अटक करत धरमपुर पोलीस ठाणे वलसाड येथे ठेवण्यात आले आहे. यामध्ये नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण, मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे,वकील सेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.कोनिक कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठुळे यांच्यासह नाशिक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor